भारतात असा एकही व्यक्ती नसेल जो बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखत नसेल कारण भारताची लोकशाही ज्या राज्यघटनेवर उभी आहे, ती राज्यघटना बाबासाहेब या...
भारतात असा एकही व्यक्ती नसेल जो बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखत नसेल कारण भारताची लोकशाही ज्या राज्यघटनेवर उभी आहे, ती राज्यघटना बाबासाहेब यांनी लिहिली आहे.
बाबासाहेबांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे आहे. ते एक हुशार राजकीय विचारवंत, वकील आणि अर्थशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांनी
अस्पृश्यतेविरोधात खूप महत्वाचा लढा दिला तसेच स्वातंत्र्यलढ्यातसुद्धा त्यांचे खूप महत्वाचे योगदान होते.
बाबासाहेब यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये तर त्यांचा मृत्यू 06 डिसेंबर 1956 रोजी झाला.
आज आम्ही बाबासाहेब यांच्या विचारांचा संग्रह आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. वाचा आणि इतरांना पाठवा.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अनमोल विचार : Dr Babasaheb Ambedkar Thoughts/Quotes in Marathi
मनाची जोपासना हे मानवी अस्तित्वाचे अंतिम लक्ष्य असले पाहिजे.
मला स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व शिकवणारा धर्म आवडतो.
आयुष्य मोठे होण्याऐवजी महान असले पाहिजे.
समानता ही एक कल्पित कथा असू शकते परंतु तरीही याला शासकीय तत्त्व म्हणून स्वीकारले पाहिजे.
धर्म हा माणसासाठी नाही तर धर्मासाठी मनुष्य आहे
जरी मी हिंदू जन्मलो, तरी मी तुम्हाला एक आश्वासन देतो की मी हिंदू म्हणून मरणार नाही
कोणत्याही गोष्टीची चव बदलता येउ शकते मात्र विष अमृतात बदलता येउ शकत नाही.
संविधान हा केवळ वकिलांचा दस्तऐवज नाही, तर तो सर्वाचे जिवन जगण्याचे साधन आहे.
Dr Ambedkar Thoughts/Quotes in Marathi
मनुष्य नश्वर आहेत तश्याच कल्पना देखील नश्वर आहेत. एखाद्या झाडाला जगण्यासाठी जशी पाण्याची गरज असते तशीच गरज कल्पनेला क्रुती असावी लागते नाहीतर त्या मरुन जातील.
उदासीनता हा सर्वात वाईट प्रकारचा आजार आहे जो लोकांना चांगल्या प्रकारे आकर्षीत करु शकतो.
जोपर्यंत आपण सामाजिक स्वातंत्र्य प्राप्त करत नाही तोपर्यंत कायद्याने मिळालेले स्वातंत्र्य आपल्या फायद्याचे नाही.
बोकडांचा उपयोग बळी अर्पण करण्यासाठी केला जातो, सिंहाचा नव्हे.
शिक्षण जेवढ पुरुषांसाठी आवाश्यक आहे तेवढच महिलांसाठी सुद्धा.
प्रचंड मेहनत करुन मिळवलेली कोणतीही गोष्ट जगात सर्वात बहुमुल्य असते.
केवळ मतदार असणे पुरेसे नाही तर कायदा करणारे बना नाहीतर कायदे करणारे लोक तुम्हाला गुलाम बनवतील.
माणसाला आपल्या दुर्गुन्नांची लाज वाटयला हवी, दरिद्रीची नाही.
Dr BR Ambedkar Thoughts/Quotes in Marathi
लोकामध्ये जाग्रुती उत्त्पन्न होईल असे राजकारण असायला हवे.
शब्दाला कृतीचे तोरण नसेल तर शब्द वांज ठरतील.
माणूस कितीही मोठा विद्वान असला आणि जर तो इतरांचा व्देष करण्याइतका स्वत:ला मोठा समजू लागला तर तो उजेडात हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्या सारखा असतो.
शिक्षण हे वाघीणीचो दूध आहे आणि जो ते प्राषण करेल तो वाघासारखा गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.
हिंसा ही खुप वाईट गोष्ट आहे मात्र गुलामी करणे ही त्यापेक्षाही वाईट गोष्ट आहे.
जर आकाशातील ग्रह-तारे माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटातील शक्तीचा उपयोग तरी काय ?
भगवान गौतम बुद्धाने सांगितलेली तत्त्वे अमर आहेत मात्र गौतम बुद्धाने मात्र तसाकधीच दावा केला नाही. वेळेनुसार त्यात बदल करण्याची सोय आहे. एवढी उदारता कोणत्याही धर्मात नाही.
मी राजकारणात, समाजकार्यात पडलो तरी, जन्मभर विद्यार्थीच राहील.
अन्यायाविरूद्ध लढा द्यायचा असेल तर आधी आपण स्वाभीमानी व स्वावलंबी बनलं पाहिजे.
विज्ञान आणि धर्म या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एखादी गोष्ट विज्ञानाचे तत्त्व आहे की धर्माची शिकवण आहे यबद्दल आपण विचार केला पाहिजे.
माणसाने जन्मभर जरी शिकायचे ठरवले तरी विद्येच्या समुद्रात गुडगाभरसुद्धा आत जाता येणार नाही.
प्र्त्येक पाऊलासोबत स्वत:च्या ज्ञानात भर टाकत जाणे यापेक्षा अधिक आनंद दुसरा नाही.
उगवत्या सूर्याला नमस्कार करतांना मावळत जाणार्या चंद्राला विसरू नका.
लोकशाहीचे दोन शत्रू आहेत पहिला ‘हुकूमशाही’ आणि दुसरा माणसां-माणसांत भेद मानणारी ‘संस्कृती’.
👉 मित्रान्नो तुम्हाला dr ambedkar thoughts,quotes in marathi, dr br ambedkar thoughts,quotes in marathi, ambedkar thought,quotes in marathi, dr babasaheb ambedkar thoughts,quotes in marathi, babasaheb ambedkar thoughts,quotes in marathi कसे वाटले ते आम्हाला comment करुन सांगा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत